महापरिनिर्वान दिनी दादर चौपाटी ला ” चैत्यभूमी ” नाव मिळणार ” ?
‘बौध्द समाजात उत्सुकता’
कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 18 रोजी जी दादर स्टेशन ला चैत्यभूमी नाव देणार अशी घोषणा करताच बौध्द समाजाची ही अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ही मागणी मुख्यमंत्री यांनी घोषणा करून समाजा चे मन जिंकले च आहे, या घोषणेमुळे समजातून मुख्यमंत्र्यांचे कौतुक होत असून येत्या 6 डिसेंबर रोजी हे नाव जाहीर करतीलच अशी सर्व स्तरातून अपेक्षा आहे.
6 डिसेंबर हा दिवस बौध्द बांधव महापरिनिर्वान दिन म्हणुन आयोजित करतात या दिवशी चैत्यभूमीवर अक्षरशः बौद्ध बांधवां चा सागर येथे बघायला मिळतो 25 तीस लाखाहून अधिक अनुयायी दादर येथे पहायला मिळतात, येथे फक्त भारतासह देश विदेशातून आलेल्या अनुयायांच्या गर्दी ने पारणे फिटतात असे म्हंटले तरी वावगे ठरते.

पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे चैत्यभूमी ला भेट देणारे पहिले पंतप्रधान आहेत. 1978 साली हिंदूह्रदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले होते. या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळाला महाराष्ट्र शासनाने दिनांक 2 डिसेंबर 2016 रोजी अ वर्ग पर्यटन आणि तीर्थ स्थळाचा दर्जा दिला आहे.
हे एक चैत्यगृह असून येथील स्तूप आंबेडकरी जनतेचे प्रेरणा स्थान असून बौध्द अनुयायांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृति अविरतपणे जपण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने 21 लाख रुपये खर्चून अखंड तेवत राहणारी भीम ज्योत उभारली आहे .
या एतिहासिक वास्तु जिथे आहे त्या दादर स्टेशन (चौपाटी)ला चैत्यभूमी नाव देण्यात जर का मुख्यमंत्री फडणवीस यशस्वी झाले तर आगामी निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या मतांचा टक्का नक्कीच वाढेल यात दुमत नाही. आणि बौध्द अनुयायी यांच्या मनात त्यांचा पक्ष जातिवादी आहे ही भावना कायमचीच निघून जाईल.
तरी महाराष्ट्र शासनाने हा योग 6 डिसेंबर या दिवशी जुळवून आणेल ही इच्छा, जर का असे झाले तर बौध्द समाजातर्फे देवेन्द्र फडणवीस यांना आंबेडकरवादी अनुयायी त्यांचे. सदैव आभारी राहील…..
