भाऊसाहेब बावणे
नांदुरा पोलीस मदत केंद्राची
दुरावस्था!
जुने बसस्थानक परिसरातील पोलीस चौकी कायम बंद; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
नांदुरा : शहरातील जुन्या बसस्थानक परिसरातील पोलीस मदत केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. एकेकाळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे हे केंद्र सध्या कायम बंद अवस्थेत आहे.

चौकीकडे जाणारा रस्ता, परिसरातील सांडपाणी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पोलीस मदत केंद्राची दुरुस्ती करून ते पुन्हा सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी याकडे लक्ष देणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
