बुलढाण्यात गुटखा तस्करीचा पर्दाफाश! दोन वाहनांसह ५० लाखांचा गुटखा जप्त; नांदुऱ्यातील विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

[metaslider id="122"]

भाऊसाहेब बावणे

बुलढाण्यात गुटखा तस्करीचे रॅकेट सक्रिय!

दोन वाहने पकडली; ५० लाखांचा गुटखा जप्त; विशेष पोलीस महानिरीक्षक व जळंब पोलिसांची कारवाई
बुलढाणा : जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करीचे जाळे सक्रिय असल्याचे जळंब पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन वाहने पकडून अंदाजे ५० लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.


दरम्यान, नांदुरा शहरातही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री व तस्करी सुरू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. मग नांदुऱ्यातील गुटखा विक्रेते, साठेबाज आणि पुरवठादारांवर कारवाई कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
तरुण पिढीच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी नांदुरा शहरातील गुटखा विक्रीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

[metaslider id="122"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights