सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी व्यंकटेश मल्टीस्टेटचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान!
राष्ट्रीय स्तरावर मिळालेला सन्मान व्यंकटेश मल्टीस्टेट च्या कार्याची महत्त्वपूर्ण दखल – कृष्णाजी मसुरे ‘ चेअरमन
मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव माने व उप-मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप शितोळे यांनी स्वीकारला पुरस्कार ,

राष्ट्रीय स्तरावर मिळालेला हा सन्मान व्यंकटेश मल्टीस्टेट या संस्थेच्या कार्याची महत्त्वपूर्ण दखल असून या यशामागे संस्थेवर विश्वास ठेवणारे सभासद, खातेदार, ठेवीदार आणि कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या विश्वास आणि सहकार्यामुळेच संस्थेला प्रगतीची नवी शिखरे गाठता आली आहेत. भविष्यातही अधिक सक्षम, पारदर्शक आणि आधुनिक आर्थिक सेवा देण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील, असा विश्वास व्यंकटेश मल्टीस्टेटचे चेअरमन कृष्णाजी मसुरे यांनी व्यक्त केला असून सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, संस्थात्मक प्रगती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीची दखल घेत व्यंकटेश मल्टीस्टेटला नवी दिल्ली येथे आयोजित इंडियन को-ऑपरेटिव्ह समिट अँड एक्सलन्स अवॉर्ड्स -2026 या प्रतिष्ठित सोहळ्यात राष्ट्रीय स्तरावरील मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले ,
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ,
संस्थेच्या वतीने हा पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव माने व उप-मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप शितोळे यांनी स्वीकारला असल्याने जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

जयप्रकाश बागडे , अहिल्यानगर
[metaslider id="122"]